ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास ‘एच 1-बी’ व्हिसावरील स्थगिती उठवेन, असे आश्वासन डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी दिले आहे.
कोरोनामुळे अमेरिकेत बेरोजगारीचे संकट ओढवल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 23 जूनला ‘एच 1-बी’ व्हिसावर तात्पुरती स्थगिती आणली आहे. या स्थगितीमुळे परदेशी नागरिकांना नोकरीसाठी अमेरिकेत येता येणार नाही. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील, असा यामागचा उद्देश होता. ट्रम्प प्रशासनाने अन्य काही प्रकारच्या व्हिसावर डिसेंबर 2020 पर्यंत निर्बंध लावले आहेत.
बिडेन यांनी आशियाई अमेरिकन आणि पॅसिफिक आयलँडवरील डिजिटल टाऊन हॉल बैठकीत ‘एच 1-बी’धारकांच्या योगदानाचे कौतुक केले. कंपनी व्हिसाच्या माध्यमातून अमेरिकेत आलेल्या नागरिकांनी या देशाची उभारणी केली आहे. मी राष्ट्राध्यक्षपदी निडवून आल्यावर एक कायदा इमिग्रेशन सुधारणा विधेयक काँग्रेसला पाठवेन, जेणेकरून कागदोपत्री नसलेल्या स्थलांतरितांचे नागरिकत्व कमी होईल. भारत हा अमेरिकेचा ‘नैसर्गिक भागीदार’ आहे. त्यामुळे भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याचे काम प्राधान्याने करेन, असेही बिडेन यांनी म्हटले आहे.