ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने के-पॉप प्रेमींसाठी अजब फतवा काढला आहे. कोरियन पॉप ऐकणाऱ्या लोकांना आता थेट 15 वर्षे लेबर कॅम्पमध्ये कैद करण्यात येणार आहे.
उत्तर कोरियामध्ये मनोरंजनाची साधने मर्यादित असून, माध्यमे आणि इंटरनेटवर सेन्सॉरशिप लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर कोरियातील लोक दक्षिण कोरियातून बेकायदेशीरपणे मनोरंजनासाठी तेथील संगीत, चित्रपटांच्या डीव्हीडी मागवतात. त्यामुळे दक्षिण कोरियाचे टीव्ही शो, चित्रपटांची लोकप्रियता उत्तर कोरियात वाढत आहे. तसेच या माध्यमातून दक्षिण कोरिया उत्तर कोरियातील समाजवादाविरोधात आणि सरकारविरोधात लोकांना चिथावणी देत आहे. त्यामुळेच किम जोंग उन यांच्या सरकारने सांस्कृतिक आक्रमण रोखण्यासाठी नवीन आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, दक्षिण कोरियातील कोणत्याही मनोरंजन विषयक साहित्याचा आस्वाद घेतल्यास 15 वर्ष लेबर कॅम्पमध्ये कैद व्हावे लागणार आहे.