प्रतिनिधी / फोंडा
तळावली येथील श्री रवळनाथ देवस्थानच्या नूतन समितीची नुकतीच निवड करण्यात आली. नूतन समितीच्या अध्यक्षपदी बाबनी तुळशीदास सावंत तळावलीकर यांची निवड झाली आहे. मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक होऊन ही समिती निवडण्यात आली.
नूतन समितीमध्ये निवडून आलेले अन्य पदाधिकारी पुढील प्रमाण आहेत. उपाध्यक्ष नितीन उमेश सावंत तळावलीकर, सचिव अमरेश आत्मा सावंत तळावलीकर, खजिनदार जितेंद्र शिवा सावंत तळावलीकर, मुखत्यार यसो गोकुळदास सावंत तळावलीकर, सहसचिव धिरेंद्र मोनू सावंत तळावलीकर, उपखजिनदार यशवंत गजानन सावंत तळावलीकर, उपमुखत्यार अनंत मंगलदास शेट तळावलीकर. निर्वाचन अधिकारी म्हणून ऍड. प्रितम सावंत तळावलीकर व गुरुदास शाणू शेट तळावलीकर यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी मामलेदार कार्यालयातर्फे निरीक्षक नियुक्त करण्यात आला होता.
श्री रवळनाथ देवस्थान अंतर्गत श्री महालक्ष्मी, श्री नारायण देव, श्री भूतनाथ, श्री सातेरी लाडबाय अशा पंचिष्ठ देवस्थानचा समावेश आहे.