ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक आणि मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या सुटकेचा अमेरिकेने विरोध दर्शविला आहे.
मुंबईत 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट राणाने रचला होता. यामध्ये अमेरिकी नागरिकांसह 166 जणांचा मृत्यू झाला होता. तर पोलिसांना 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आणि अजमल कसाबला जिवंत पकडण्यात यश आले होते. त्यानंतर भारताने राणाला फरार घोषित केले होते.
मुंबईवरील हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली राणाला 2009 मध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली होती. राणाची शिक्षा 2021 मध्ये संपणार होती. मात्र, अमेरिकेने त्याच्या सुटकेला विरोध दर्शविला आहे. तसा रिपोर्टही कॅलिफोर्नियाच्या कोर्टात दाखल करण्यात आला आहे. राणाला भारताच्या ताब्यात द्यावे, अशी विनंती भारताने अमेरिकेकडे केली आहे. त्यासंदर्भात कोर्टात सुनावणी सुरू आहेत.