बहिण शगुन घेतेय वेडिंग वेन्यूचा शोध
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू स्वतःच्या अभिनयासह बॅडमिंटनपटू मॅथियस बो याच्यासोबतच्या रिलेशनशिपवरूनही चर्चेत असते. मागील काही काळापासून तापसीला विवाहाबद्दल विचारणा होत आहे. तापसीने यावर कुठलेच उत्तर दिले नसले तरीही तिची बहिण शगुनने यासंबंधी संकेत दिले आहेत. तापसीच्या विवाहासाठी वेडिंग वेन्यू पाहिला असल्याचे तिने म्हटले आहे.
शगुन स्वतः वेडिंग प्लॅनर आहे. तापसीच्या आईवडिलांना ती कधीच विवाह करणार नसल्याची भीती वाटते. माझ्या आईवडिलांना पसंत न पडणाऱया व्यक्तीशी मी विवाह करणार नाही. याचबरोबर रिलेशनशिपमध्ये मी टाइमपास करू इच्छित नसल्याचे तापसीने याप्रकरणी म्हटले आहे.
तापसी अलिकडेच ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. तापसी आता रश्मि रॉकेट, लूप लपेटा, दोबारा, शाबास मिठू आणि ब्लर या चित्रपटांमध्ये काम करत आहे. या चित्रपटांसह 3 तमिळ आणि एक तेलगू चित्रपटातूनही दिसून येणार आहे.