ऑनलाईन टीम / काबुल :
फेसबुकने तालिबानी नेते आणि त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या सर्व अकाऊंटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने यासंदर्भात माहिती दिली.
तालिबान ही अमेरिकेच्या कायद्यानुसार दहशवादी संघटना आहे. या संघटनेचे अनेक नेते सोशल मीडियावर सक्रिय असून, ते ट्विटर, फेसबुकद्वारे आपले म्हणणे मांडत असतात. तसेच तालिबानच्या समर्थकांकडूनही यासंदर्भात अनेक पोस्ट शेअर होत आहेत. फेसबुक स्वतंत्र टीमच्या आधारे अशा प्रकारच्या पोस्ट प्लॅटफॉर्मवरुन हटवत आहे. दरम्यान, फेसबुकचा मार्ग बंद झाल्याने तालिबानी आता ट्विटरसह अन्य प्लॅटफॉर्मकडे वळण्याची शक्यता आहे.