किणये : तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये बुधवारी श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनामुळे साध्या पद्धतीनेच हा सोहळा साजरा करण्यात आला. रामनवमीनिमित्त विविध गावातील श्रीराम मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर रामनामाचा जयघोष झाला.
हलगा गावात रामनवमी साजरी करण्यात आली. गावातील मुख्य रस्त्याच्या बाजूला श्रीरामाचे छोटेसे मंदिर आहे. या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी श्रीराम मूर्तीला विधिवत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर आरती झाली व उपस्थित कार्यकर्त्यांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जीवनकथेवर आधारित काही तरुणांची भाषणे झाली. राम-लक्ष्मण, भरत-शत्रुघ्न यांचे बंधूप्रेम प्रत्येक कुटुंबात असायला हवे. तसेच ईश्वराची भक्ती हनुमंताप्रमाणे करायला हवी, असेही काही मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी भाऊराव दौलतकर, अमोल कामाण्णाचे, राजू परिट, प्रसाद धामणेकर, मारुती दंडकर, प्रवीण संताजी, नागराज बिळगोजी आदी उपस्थित होते. रात्री पुन्हा महाआरती झाली. सर्व कार्यक्रम प्रशासनाच्या कोरोना नियमावलीप्रमाणे झाले.
किणयेतील विठ्ठल-रखुमाई मंदिरात रामनवमी साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांतर्फे श्रीराम मूर्तीपूजन करण्यात आले. त्यानंतर वारकऱयांनी विठ्ठल-रखुमाई मूर्तीचे पूजन केले. महिलांनी पाळणा गीत म्हणून श्रीराम जन्मोत्सव साजरा केला. यानिमित्त तीर्थप्रसाद वाटप केले.