दीपक दळवी यांच्यावर शाईफेक केल्याबद्दल गावागावांमध्ये धरणे आंदोलन : सर्व व्यवहार-दुकाने बंद ठेवून निषेध : सीमाबांधव आपली ताकद दाखविणार
वार्ताहर /किणये
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड गुंडांनी शाईफेक केल्याच्या निषेधार्थ म. ए. समितीने मंगळवारी बेळगाव बंदची हाक दिली होती. या बंदला तालुक्मयाच्या सर्रास भागातून प्रतिसाद मिळाला. समस्त सीमाबांधव म. ए. समिती व दीपक दळवी यांच्यासोबत असल्याचा ठाम निर्धार तालुक्मयातील नागरिकांनी केला आहे.
सोमवार दि. 13 रोजी व्हॅक्सिन डेपो येथे महामेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी काही कन्नड गुंडांनी दीपक दळवी यांच्यावर शाईफेक केली. या भ्याड कृत्याचा तालुक्मयातील सीमाबांधवांनी जाहीर निषेध केला. मंगळवारी आपापल्या गावांतील सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवून समितीच्या बेळगाव बंदला पाठिंबा दर्शविला.
दीपक दळवी यांच्यावर शाईफेक केल्यानंतर सीमाबांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांच्या उपस्थितीतच कन्नड गुंड समिती नेत्यांवर शाईफेक करतात, याला जबाबदार कोण? असा सवाल सीमावासीय उपस्थित करीत आहेत. प्रशासन व कन्नड गुंड सीमाबांधवांवर कितीही अन्याय, अत्याचार करू देत, मात्र आपली रस्त्यावरची लढाई अधिकच तीव्र होत जाणार असल्याचे समितीच्या नेतेमंडळींनी सांगितले.
केंद्राने दखल घेण्यासाठी मेळावा
गेल्या 65 वर्षांपासून सीमाप्रश्नाचा लढा लोकशाही मार्गाने चालू आहे. बेळगाववर कर्नाटक सरकार वर्चस्व दाखविण्यासाठी सुवर्ण विधानसौध तसेच विविध शासकीय कार्यालये बांधून बेळगाव कर्नाटकाचे असल्याचे दाखवित आहे. हिवाळी अधिवेशनाला गेल्या काही वर्षांपासून म. ए. समितीच्यावतीने प्रत्युत्तर देण्यासाठी व सीमाबांधवांवर झालेल्या अन्यायाची केंद्र सरकारने दखल घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा भरविण्यात येतो.
या महामेळाव्यासंदर्भात गेल्या 15-20 दिवसांपासून गावागावांमध्ये जनजागृती बैठका झाल्या. सोमवारी होणाऱया महामेळाव्याला सीमाबांधवांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होणार यामुळे पोलिसांकरवी कार्यकर्त्यांवर दबाव टाकण्याचे कार्य रविवारी रात्रीपासूनच सुरू केले. सोमवारी आंदोलनाला येणाऱया कार्यकर्त्यांना अडविण्याचे सत्रही सुरू होते. मात्र, तीव्र इच्छा मनात बाळगून समितीचा कार्यकर्ता व्हॅक्सिन डेपो महामेळाव्याच्या ठिकाणी पोहोचलाच. नेतेमंडळींसह महिला व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित झाले. याचवेळी काही कन्नड गुंड दाखल झाले आणि त्यांनी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाईफेक केली.
अधिक बळकटी देण्याचा निर्धार
महामेळाव्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तितक्मयाच ताकदीनिशी विरोध झुगारून महामेळावा यशस्वी करण्यात आला. दीपक दळवी यांच्यावर कन्नड गुंडांनी शाईफेक केली. पण याचा घाव प्रत्येक सीमाबांधवांमध्ये लागून राहिला आहे. सोमवारच्या या भ्याड कृत्यानंतर शहरासह तालुक्मयात पुन्हा सीमाबांधवांची एकजूट झाली आहे. लोकशाही मार्गाने या लढय़ाला अधिक बळकटी देण्याचा नेते-कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे.
दीपक दळवी यांच्यावर शाईफेक केल्यामुळे दुपारपासूनच तालुक्मयातील गावांमध्ये निषेध करण्यात आला. समितीने पुकारलेल्या मंगळवारच्या बंदला मोठा प्रतिसाद लाभला. गावागावांमध्ये मंगळवारी सर्वच दुकाने, व्यवहार बंद ठेवण्यात आले. शेतकरी शेतशिवारातसुद्धा गेले नाहीत. काही गावांमध्ये कार्यकर्ते गावच्या चौकात, वेशीत जमा होऊन या भ्याड कृत्याचा निषेध नोंदवित होते .सीमावासीयांना नेहमीच डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय. आता वेळ गप्प बसून राहण्याची नाही. आपल्या नेत्यावर शाईफेक केल्यामुळे तरुणवर्ग पेटून उठला आहे. हलगा गावातील सीमावासीयांनी गावातील दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. वाघवडेत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. म. ए. समितीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे राहू, असा निर्धार समिती नेते व कार्यकर्त्यांनी केला.
व्यवहार बंद ठेवून निषेध बेळगुंदीत छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोर समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दीपक दळवी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. त्याच ठिकाणी बसून ठिय्या आंदोलन छेडले व प्रशासनाने त्या कन्नड गुंडांवर कारवाई करून सीमावासीयांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. गावातील सर्व दुकाने बंद ठेवल्यामुळे गल्ल्या-गल्ल्यांमध्ये शुकशुकाट पसरला होता. बेळगाव बंदनिमित्त तालुक्मयाच्या काही भागात बससेवा बंद होत्या. देसूर, किणये, बिजगर्णी, राकसकोप, बेळवट्टी, बोकनूर भागात नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून पाठिंबा दर्शविला.