प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुक्मयातील चार गावांमध्ये कोरोना रुग्ण सापडले आहेत. सध्या हिरेबागेवाडी हे गाव अजूनही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून आहे. नुकतीच तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी हिरेबागेवाडी गावाला भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी एका निराधार आई व मुलाला त्यांनी सढळ हस्ते मदत केली. त्यांची अवस्था पाहून तेही भावुक झाले होते.
सध्या हिरेबागेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व एका मंदिरामध्ये आरोग्य तपासणीचे काम सुरू आहे. शनिवारी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी हिरेबागेवाडी गावाला भेट दिली. यावेळी मंदिराबाहेरच एक दिव्यांग मुलगा आणि त्याची आई बसली होती. यावेळी त्या महिलेची विचारपूस कलादगी यांनी केली. त्या महिलेने आपल्यावर बेकारीची कुऱहाड कोसळली आहे. माझे पती एक वाहन चालक आहेत. मात्र संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने ते कामालाही गेले नाहीत. त्यामुळे आमच्या पोटापाण्याचे हाल सुरू आहेत, असे सांगितले.
सध्या तुम्ही काय करता आणि आपला मुलगा असा कसा? असा प्रश्न कलादगी यांनी त्या महिलेला विचारला. यावेळी त्या महिलेने आपला मुलगा 9 वर्षाचा आहे. मात्र, प्रसूतीवेळी आपल्या मुलाच्या डोक्मयाला इजा झाली आणि लहानपणापासूनच तो अधू बनला आहे. त्याची मती व अंग लुळे पडले आहे. सध्या आपण हिरेबागेवाडी गावात भाडोत्री खोली करून राहतो. सध्या भाडे देण्याइतकेही पैसे आपल्याकडे नाहीत. त्यामुळे आपल्याला मदत करावी, अशी विनवणी त्या महिलेने केली. त्यावेळी कलादगी यांनी त्या महिलेला ग्राम पंचायतकडून मदत आणि मुलाला अपंग असल्याने पेन्शन लागू केली आणि स्वतःकडील काही रक्कम देऊन मदत केली. यावेळी ही परिस्थिती साऱयांनी पाहिली. त्यामुळे अनेकांचे डोळे पाणावले.
ता. पं. कार्यकारी अधिकरी मल्लिकार्जुन कलादगी
याबाबत तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण काहीच केले नाही. केवळ ते आपले कर्तव्य होते. आपण छत्रपती शिवाजी महाराज व श्री बसवेश्वर यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे असून मी त्याच अनुषंगाने वागत असल्याचे त्यांनी सांगितले.