वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील काही वर्षांपासून तालुका पंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकाऱयांची बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे अनेक सदस्यांचा आणि ग्राम विकास अधिकाऱयांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. याच अनुषंगाने तालुका पंचायत सदस्य, पिडीओ तसेच तलाठय़ांची बैठक घेण्याची मागणी होत आहे.
तालुका पंचायत सदस्य व सर्व पिडीओंची एकत्रित बैठक घेण्याची मागणी सदस्यांतून वारंवार करण्यात येत आहे. मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून कानाडोळा करण्यात येत आहे. वारंवार सर्वसामान्य सभेत पिडीओ आणि सदस्यांची बैठक घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मात्र ही बैठक घेण्याकडे अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोना काळात बैठक घेण्याचे टाळण्यात आले असले तरी यापुढे तरी ही बैठक घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, जर ही बैठक झाली तर उनेधुणे काढण्यात येणार असल्यामुळे अनेकांचे पितळ बाहेर पडण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ही बैठक का घेण्यात येत नाही? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तालुका पंचायत सदस्यांना कोणत्याही कार्यक्रमात प्रामुख्याने प्राधान्य देणे गरजेचे आहे. मात्र ग्राम विकास अधिकारी सदस्यांना कोणतीच किंमत देत नाहीत. त्यामुळे ग्राम विकास अधिकारी आणि तालुका पंचायत सदस्यांची एकत्रित बैठक घेण्यात यावी, यासाठी दोन वेळा सर्वसाधारण सभेत आवाज उठविण्यात आला.
सदस्य आणि पिडीओंची बैठक घेतली जावी, असा आदेश काढण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. सदस्य म्हणतात कोणत्याही कार्यक्रमाचा शुभारंभ, भूमिपूजन व इतर कार्यक्रम ज्या तालुका पंचायत सदस्याच्या कार्यक्षेत्रात असते, त्या कार्यक्रमासाठी जाणूनबुजून त्या सदस्यांना सांगण्यात येत नाही, अशी ओरड कायम आहे. ग्राम पंचायतमध्ये गेल्यास पिडीओ ता. पं. सदस्यांना चांगली वागणूक देत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच ही बैठक घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे..