वर्षापूर्वी झाली होती बैठक : बैठक घेण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
तालुका पंचायतीच्या स्थायी समित्यांची बैठक घेण्याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या समित्यांची स्थापनाच कशासाठी करायची? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या बैठकींना कधी मुहूर्त सापडणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मागील वषीच या बैठका झाल्या होत्या. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्थायी समित्यांच्या अध्यक्षांनी आणि सदस्यांनी बैठक घ्यावी, अशी मागणी होत आहे.
2019 मधील 22 नोव्हेंबर रोजी या बैठकी घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न झाला. मात्र केवळ अवघ्या 15 मिनिटांत बैठकी आटोपत्या घेण्यात आल्या. त्यामुळे स्थायी समित्यांना अर्थच राहिला नसल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक वेळा स्थायी समितीच्या सदस्यांनी आणि अधिकाऱयांनी बैठक घेण्याकडे पाठ फिरविली आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच बैठका घेऊ, असे आश्वासन दिले.
तालुका पंचायतीमध्ये स्थायी समितींच्या निवडणुका घेण्यात आल्या. समित्यांची निवडणूक न होता संगनमताने स्थायी समित्यांच्या सदस्यांनी बैठकीतच निवड करून घेऊन अनेकांना डावलण्याचे प्रकारही घडले. त्यामुळे चर्चेत असणाऱया स्थायी समित्यांच्या सदस्यांनी आणि अध्यक्षांनी बैठकी घेण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. तसे पाहता सहा महिन्यांतून एकदा तरी स्थायी समित्यांच्या बैठका घेणे गरजेचे आहे. मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे.
स्थायी समिती निवडणुकांवेळी काही महिलांनी याला विरोध दर्शविला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करून ही निवडणूक झाली होती. निवडणूक होऊनही बराच काळ लोटला आहे. मात्र, स्थायी समित्यांची बैठक एकदाच घेण्यात आली. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून स्थायी समितींची निवड करण्यात आली असली तरी अनेकांना या समित्यांचे महत्त्वच माहिती नसल्याचे दिसून आले आहे. आजतागायत एकाही स्थायी समितीच्या सदस्यांनी कोणत्याच गावाला भेट दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थायी समित्यांची कामे काय, त्यांच्याकडे कोणता अधिकार आहे याची थोडीशीही माहिती संबंधित सदस्यांना नसल्याचे दिसून येत आहे. बेळगाव तालुक्मयातील चारही स्थायी समित्यांच्या सदस्यांना महत्त्व नाही हे स्पष्ट होत असले तरी किमान बैठका तरी घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.