जागतिक क्रमवारीत एचसीएल सातव्या तर विप्रो नवव्या स्थानी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) जगातील तिसरा सर्वोच्च मूल्यवान आयटी सर्व्हिसेस ब्रँड बनला असल्याची माहिती फायनान्सच्या नवीन अहवालात देण्यात आली आहे.
आयटी क्षेत्रात अलीकडची वाटचाल कंपनीची दमदार राहिली आहे. चालू वर्षातील ग्लोबल ब्रँड रँकिंगमध्ये प्रथम स्थानावर ऍक्सेंचर, दुसऱया स्थानी आयबीएम, तिसऱया नंबरवर टीसीएसने झेप घेतली असून चौथ्या स्थानी इन्फोसिस आणि 5 व्या स्थानी कॉनिझंटचा समावेश आहे.
जागतिक पातळीवरील ग्लोबल रँकिंगमध्ये चार भारतीय आयटी सर्व्हिसेस कंपन्यांचा समावेश राहिला आहे. यामध्ये टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल (सातव्या स्थानी) आणि विप्रो (9 वे स्थान) यांचा समावेश आहे.
ताज्या रँकिंगमध्ये इन्फोसिसने कॉनिझंटला मागे टाकले आहे. टॉपच्या 10 ब्रँडमध्ये इन्फोसिसचे ब्रँड मूल्य सर्वात वेगाने वधारले आहे. यासोबत एचसीएलला 7 व्या क्रमांकावर आणि विप्रोला 9 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. टेक महिंद्रा पंधराव्या स्थानी असून यांचे ब्रँड मूल्य 2.3 अब्ज डॉलर्स आहे.