सेन्सेक्स 314 तर निफ्टी 100 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी भारतीय भांडवली बाजारात घसरणीचा प्रवास कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये विविध कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि कोटक बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स 314 अंकांनी घसरुन निर्देशांक नुकसानीत राहिला होता. सलग दुसऱया दिवशी तब्बल तीनशे अंकांनी नुकसान झाले आहे. बुधवारी दिवसअखेर सेन्सेक्स 314.04 अंकांनी घसरुन 60,008.33 वर बंद झाला आहे.दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी100.55 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,898.65 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बुधवारी सेन्सेक्समध्ये ऍक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक दोन टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, भारती एअरटेल, टायटन, डॉ.रेड्डीज लॅब आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, एशियन पेन्ट्स, पॉवरग्रिड कॉर्प आणि एनटीपीसीचे समभाग नफा कमाईत राहिल्यचे दिसून आले आहे.
जागतिक पातळीवरील स्थिती
जागतिक पातळीवरील अन्य आशियातील बाजारात हाँगकाँग, टोकीओ आणि सोल हे नुकसानीत राहिले आहेत. यासह शांघायमधील ट्रेडिंग वाढीसोबत बंद झाला. युरोपातील जास्तित जास्त शेअर बाजारात सत्राच्या मध्यापर्यंत तेजी राहिली होती. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क बेंट क्रूड 0.90 टक्क्यांनी घसरुन 8.69 डॉलर प्रति बॅरेलवर आली आहे.