ऑनलाइन टीम / वढू बद्रुक :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वामी रामदास हे छत्रपती शिवरायांचे गुरू नाही असे वक्तव्य केले होते. यावर वक्तव्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि राजमाता जिजाऊसाहेब हेच शिवरायांचे खरे गुरू आहेत.
वढू बद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा 340 वा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार संभाजी महाराज बोलत होते.
दरम्यान, संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्या छत्रपती घराण्याच्या वंशजासंदर्भात पुरावे मागितले. यावर बोलताना भोसले म्हणाले, आम्हीं छत्रपतींच्या घराण्याबद्दल काय पुरावे द्यायचे? आमचे छत्रपतींचे घराणे आहे. तोंडात येईल ते काही बोलून चालत नाही. राऊत यांनी बिनबुडाचे आरोप करू नये, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.