वार्ताहर/ उचगाव
तुरमुरी येथील शिवमुद्रा मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या खुल्या हाफपीच क्रिकेट स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. स्पर्धेत 128 संघांनी भाग घेतला होता. यामध्ये एसआरएस अनगोळ पँथर्स बेळगाव यांनी प्रथम क्रमांकाचा चषक पटकाविला.
विजयी संघांना पारितोषिक वितरण सोहळा तुरमुरी ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष नागनाथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी विमा प्रतिनिधी सहास जाधव, चांगदेव बेळगावकर, केवल राजूकर, सचिन तुप्पट, गुंडू खांडेकर, प्रशांत तंगाणकर उपस्थित होते.
द्वितीय क्रमांक एसआरएस हिंदुस्थान अनगोळ-बेळगाव, तृतीय सेवालाल कंग्राळी या संघांनी पटकाविला. उत्कृष्ट फलंदाज रवी कोटबर्गी, उत्कृष्ट गोलंदाज वसंत शहापूरकर यांनी मिळविला. त्यांना केवल राजूकर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार केला. मॅन ऑफ द मॅच सुहास जाधव यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन विजय खांडेकर यांनी केले. विक्रम जाधव यांनी आभार मानले.
जमा निधी मराठी शाळेला तालुक्यामध्ये अनेक युवक मंडळातर्फे विविध स्पर्धा भरवून प्रवेश फी च्या नावाखाली जमा झालेली रक्कम मजा-मौज, पाटर्य़ा करण्यात खर्ची घातली जाते. मात्र, तुरमुरी गावातील शिवमुद्रा मित्र मंडळ हे एक असे मंडळ आहे की या स्पर्धेतून जमा झालेली अंदाजे 50 हजार रुपये शिल्लक रक्कम मराठी शाळेच्या सुधारणेसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी देखील या मंडळाने असे उपक्रम राबविले आहेत. यांचा आदर्श इतर मंडळांनी घेणे गरजेचे आहे.