उचगाव ः15-41
अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ उचगाव संचालित तुरमुरी येथील रामलिंग हायस्कूलमध्ये डेंग्यू, मलेरिया तसेच जागतिक लोकसंख्या दिन याबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रकाश चलवेटकर होते.
सध्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचून डबकी निर्माण झाली आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या आजारांचा फैलाव होऊ नये, तसेच लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे या संदर्भात शिबिरामध्ये उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. अग्निहोत्री, डॉ. आनंदा यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रकाश चलवेटकर यांनी केले. यावेळी एन. एम. बोकडे, एन. वाय. पाऊसकर, एल. आर. कोणेवाडीकर, पी. जी. पाटील, आशा कार्यकर्त्या चंदा जाधव, प्रज्ञा सोमनाथ, किरण तुडयेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन एल. आर. पाटील यांनी केले. आभार एम. टी. बेळगावकर यांनी मानले.