इस्तंबूल
एजियन समुद्रात झालेल्या भूकंपाचा जबर तडाखा तुर्कस्थान या देशाला बसला आहे. या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल इतकी असून तो समुद्रात 16.5 किलोमीटर खोलीवर झाल्याची नोंद करण्यात आली. या भूकंपाने विशेषतः नुकसान मध्य इझमिर विभागात झाले. या भागात अनेक इमारतींना आगीही लागल्या. मदत व बचावकार्याला वेग आला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.