मुंबई
जगातील विविध देशांच्या केंद्रीय बँकांनी(रिझर्व्ह बँक) आपले सोने विकण्यास सुरुवात केली आहे. वर्ष 2010 नंतर पहिल्यांदाच सोने विकण्यास सुरुवात झाली आहे. तिसऱया तिमाहीमध्ये आतापर्यंत 12.1 टन सोने विक्री या बँकांनी केली आहे. ज्या देशांनी सोने विकण्यास सुरुवात केली आहे त्यामध्ये उजबेकिस्तान आणि तुर्कीचा समावेश आहे. यांनी मागील 13 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच सोने विकल्याची माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालामधून दिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार एक्सचेंज टेडेड फंडअंतर्गत सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. मागच्या महिन्यात सिटी गुपने सेंट्रल बँकेकडून सेने मागणी 2021 मध्ये पूर्वपदावर येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.