बेळगाव / प्रतिनिधी
दसरा, दिवाळी व तुळशी विवाहासाठी बाजारात मोठय़ा प्रमाणात उसाची आवक असते. गुरुवारपासून सुरू झालेल्या तुळशी विवाहाला बाजारात मोठय़ा प्रमाणात ऊस दाखल झाले असून शहरातील विविध भागात विपेते उसाची विक्री करताना दिसत आहेत.
तुळशी विवाहासाठी उसाला मागणी असते. त्यामुळे बाजारात ऊस विक्रीसाठी आणले जातात. गुरुवारपासून तुळशी विवाहाला सुरुवात झाली असून पाच दिवस म्हणजे सोमवारपर्यंत हे विवाह चालणार आहेत. त्यामुळे शहरात उसाची आवक वाढली आहे. शहराबरोबर ग्रामीण भागात देखील तुळशी विवाह असल्याने यासाठी लागणाऱया साहित्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर फुलांची आवक देखील वाढली आहे. शहरातील काकतीवेस, जुना पी. बी रोड, समादेवी गल्ली आदी ठिकाणी ऊस विक्री सुरू आहे. 50 ते 60 रुपयांना 5 नग अशी उसाची विक्री सुरू आहे.