प्रतिनिधी /वाळपई
वाळपई मतदारसंघातून तृणमूल काँग्रेस पक्षासाठी सक्रिय काम करणारे दशरथ मांदेरेकर यांची काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यासंदर्भाचा आदेश आज संध्याकाळी जारी करण्यात आला.
गेल्या चार महिन्यांपासून दशरथ मांदेरकर यांनी वाळपई मतदारसंघात त्याप्रमाणे पर्ये मतदारसंघांमध्ये करून तृणमूल काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचण्यासाठी कार्य केलेले आहे. पक्षाच्या कार्य विस्तारासाठी मोठे योगदान दिलेले आहे. या योगदानाची दखल घेऊन त्यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दरम्यान, दशरथ मादेकर यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षासाठी वेगवेगळय़ा स्तरावर केलेल्या कार्याची पोचपावती पक्षाने दिलेली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्ष विस्तार करण्याच्या दृष्टिने केलेल्या कार्याची दखल घेऊन माध्यमातून आपली निवड करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी काळातही पक्षाच्या विस्तारासाठी सक्रियपणे सहभाग दर्शविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. त्याचप्रमाणे पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला अजिबात तडा जाणार नाही, असेही मांद्रेकर यांनी स्पष्ट केले आहे.