बेंगळूर/प्रतिनिधी
एचएएलकडून ८३ तेजस एलसीए खरेदी करण्यासाठी सरकारकडून ४८ हजार कोटी रुपयांच्या करारावर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान बेंगळूरमध्ये आजपासून तीन दिवस चालणाऱ्या ‘ऐरो इंडिया शो’ला सुरुवात झाली. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ऐरो इंडिया शो चे उद्घाटन झाले.
यावेळी राज्य सरकारने चालविलेल्या एरोस्पेस, हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड कडून ८३ तेजस लाइट लढाऊ विमान खरेदीसाठी ४८ हजार कोटी रुपयांच्या करारास बुधवारी सरकारने औपचारिक मान्यता दिली. देशातील प्रमुख संरक्षण आणि एरोस्पेस शोच्या एरो इंडिया -२०११ च्या उद्घाटन समारंभात संरक्षण मंत्रालयाचे महानिदेशक (अधिग्रहण), व्ही.एल. कंठा राव यांनी एचएएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांच्याकडे हा करार केला होता. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे उपस्थित होते.