अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 1 जानेवारी 2022, सकाळी 11.30
● शनिवारी रात्री नव्याने 53 जण बाधित
● 2586 जणांचे स्वॅब तपासणी
● पॉझिटिव्हीटी 2.05 वर
● ओमिक्रॉनचा नुसताच कांगावा
सातारा / प्रतिनिधी :
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जगावर ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संकट आले. मात्र, हा नुसताच गवगवा व भीती पसरवण्याचा प्रकार आहे, अशीही एका बाजूला चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ओमिक्रॉनबाधित पाचही जण ठणठणीत आहेत. पहिले चार जण तर चांगले ठीक बरे झाले असून दोन दिवसांपूर्वी सातारा शहरातील आढळून आलेल्या ओमिक्रॉनबाधित युवतीला कसलीही लक्षणे नाहीत. तीही ठणठणीत आहे. नव्याने शनिवारी जाहीर झालेल्या अहवालात 53 जण बाधित आढळून आले. 2586 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले.
जिल्ह्याची पॉझिटिव्हीटी 2.05 टक्क्यांवर
2021 वर्षाच्या सुरुवातीला तीन-चार महिने कोरोनाबाधित वाढत होते. पुन्हा नंतरच्या काळात बाधित वाढ ही कमी होत गेली सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या चार महिन्यात कोरोना बाधित होण्याचे प्रमाण बारा ते 20 च्या आसपास आढळून येत होते. नव्या 2022 या वर्षाच्या पहिल्या दिवशी 53 जण आढळून आल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. बाधित वाढ जरी दिसत असली तरीही कोणतेही भिण्याचे कारण नाही, असे आरोग्य यंत्रणेकडून आवाहन करण्यात येत आहे.
कोरोना, ओमिक्रॉनसारखी संकटं टाळण्याचा नवीन वर्षी संकल्प
गेली दोन वर्ष कोरोनामुळे अनेकांना झळ बसली. रुग्णालयाचे बिल देण्यासाठी होती नव्हती ती कमाई खर्च काहींनी केली. अनेकांची वाताहत झाली. मात्र, आता नव्या 2022 या वर्षात कोरोना, ओमिक्रॉन व्हेरिएंट यासारख्या येणाऱ्या महामारीच्या संकटाला रोखण्याचा आणि धीराने तोंड देत पुढे जाण्याचा संकल्प जिल्हावासीयांच्यावतीने करण्यात आलेला आहे.
शनिवारी
नमुने-2586
बाधित-53
शनिवारपर्यंत
नमुने-23,70,163
बाधित-2,52,461
मृत्यू-6498
मुक्त-2,44,994