तरुण भारत संवाद ने घेतली होती दखल
प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तिथे सरशी हे वाक्य बार्शी साठी प्रचलित आहे. सुखाचा असो अथवा दुःखाचा प्रसंग सामान्य बार्शीकर हा हमेशा एकमेकांच्या पाठीशी राहिला आहे. हा बार्शी चा इतिहास आहे. याची प्रचिती आज अजून एकदा बार्शीकरांनी अनुभवली. दिनांक 9 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास शिवाजीनगर भागातील शिवसाई समाधान तांबिले या सहा वर्षाच्या मुलावर पाच मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केले होते. या मुलाच्या पालकांची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे. तसेच त्या मुलाच्या पालकास त्याचा उपचार करण्यास पैसे नव्हते.ही बाब दैनिक तरुण भारत ने बातमीद्वारे जाहीर केले होते. या दैनिक तरुण भारत संवाद च्या आव्हानास बार्शी येथील स्नेहग्राम चे महेश निंबाळकर या सामाजिक कार्यकर्त्या युवकाने लागलीच दखल घेत.आपल्या मित्रपरिवारास आणि संस्थास या मुलाच्या पालकास मदत करण्याचे जाहीर केले. आणि काही तासातच ऑनलाइन पैसे पाठवून बार्शी आणि परिसरातील दात्यांनी यासाठी मदत केली. आणि आज सकाळी त्या जखमी शिवसाईचे वडील समाधान तांबिले यांना जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन पंधरा हजारांची मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की दिनांक 9 मे रोजी शिवाजीनगर भागात राहणाऱ्या शिवसाई या सहा वर्षाचा बालक खेळण्यासाठी घराबाहेर आला असता या परिसरातील पाच मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढविला होता त्यात या सहा वर्षाच्या चिमुरड्याच्या शरीराचे लचके तोडले होते. त्याच्या शरीरावर या कुत्र्यांच्या दाताच्या खोल जखमा झाल्याने त्याला जगदाळे मामा हॉस्पिटल या दवाखान्याच्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल केले होते. त्याच्यावर उपचार चालू असताना त्याचे पालक हे मोलमजुरी करून जगणारे असणारे असल्याने त्याच्या उपचाराचा मोठा खर्च कसा भागवायचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. ही बाब दैनिक तरुण भारत संवाद ने बातमीच्या द्वारे पुढे आणले असता बार्शी येथे स्नेहग्राम नावाचे पारधी मुलांचे वस्तीग्रह शाळा चालवणारे सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर आणि बार्शी तालुका काँग्रेस अध्यक्ष एडवोकेट जीवनदत्त आरगडे यांनी यासाठी प्रयत्न केले. आणि आपल्या परिसरातील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले.
या आवाहनानंतर काही तासातच त्यांच्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला आणि रुपये.15000 रक्कम जमवून ती रक्कम त्या दवाखान्यात जाऊन बालकाच्या पालकाच्या स्वाधीन केली. हा हल्ला झाल्यानंतर बार्शी चे नगराध्यक्ष एडवोकेट आसिफ भाई तांबोळी यांनी या मुलाचा उपचाराचा खर्च करण्याचे जाहीर केले होते. अर्थात नगराध्यक्ष असिफ तांबोळी हे दवाखान्याशी बोलून त्याचा खर्च उचलतिल ही परंतु या कुटुंबावर लोकडॉऊन मुळे आलेल्या उपासमारीच्या वेळेत त्यांच्यावर झालेला हा आघात यातून सावरण्यासाठी आज बार्शीतील या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि युवकांनी केलेली मदत ही नक्कीच कौतुकाचे ठरणार आहे. यावेळी त्यांना ही मदत देताना बार्शीचे स्नेहग्राम चे संचालक महेश निंबाळकर, बार्शी तालुका काँग्रेस अध्यक्ष एडवोकेट जीवन दत्त आरगडे एडवोकेट सुहास कांबळे , बालाजी डोईफोडे व इतर उपस्थित होते त्यामुळे आज बार्शीत माणुसकी जिवंत आहे याची प्रचिती येत आहे.