प्रतिनिधी/खेड
दुबईतून आलेल्या अल्सुरे येथील 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने बळी गेल्यानंतर हादरलेल्या प्रशासनाने ‘त्या’ व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची शोधमोहीम हाती घेतली होती. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह अठ्ठावीस जणांना कळंबनी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णालयात आयसोलेशमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले होते. या सर्वांच्या स्वबचे नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले होते. या सर्वांचा अहवाल शनिवारी सकाळी प्रशासनास प्राप्त झाला असून 28 जणांचा कोरोना हवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. शुक्रवारी रात्री आणखी दहा जणांना रिलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. या नागरिकांचे नमुने तपासणीसाठी मिरज ते पाठवण्यात येणार आहेत.