उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. मात्र दिवसभराच्या धावपळीत आपलं त्वचेकडे दुर्लक्ष होत असतं. पण सध्या अनेक ठिकाणी लॉकडाउन आणि वर्क फ्रॉम होम असल्यामुळे महिलावर्गाला थोडी उसंत आहे. जास्तीत जास्त वेळ घरात असताना त्वचेला नवतजेला देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करता येतील. घरी उपलब्ध असणार्या घटकांपासून उटणी किंवा फेस पॅक तयार करून तुम्ही चेहरा उजळवू शकता.
- मसूर डाळ आणि संत्र्याच्या सालापासून फेस पॅक तयार करता येईल. यासाठी दोन चमचे मसूर डाळ, संत्र्याची साल आणि बदाम दुधात वाटून घ्या. हा पॅक चेहर्यावर लावून पंधरा मिनिटांनी धुवून टाका. तुमचा चेहरा उजळ दिसेल. मसूर डाळीतल्या प्रथिनांमुळे चेहर्याचा काळपटपणा दूर होतो. तसंच त्वचा मुलायम होते.
- बेसन आणि दह्याचा पॅक तयार करून त्यात थोडी साय तसंच चिमूटभर हळद घाला. हा पॅक चेहर्याला लावून अर्ध्या तासाने धुवून टाका. यामुळे चेहरा उजळ होतो. शिवाय त्वचा चमकदार दिसू लागते.
- बार्ली या धान्याचा वापर करूनही पॅक तयार करता येईल. यासाठी बार्ली वाटून घ्या. त्यात काकडीचा आणि पपईचा गर मिसळा. थोडं दही घाला. यात लिंबाचा रसही घालता येईल. हा पॅक चेहरा आणि गळ्यावर लावून अर्ध्या तासाने धुवून टाका. यामुळे मृत त्वचा दूर व्हायला मदत होते. चेहर्यावरील सुरकुत्या तसंच पिंपल्स घालवण्यासाठीही या पॅकचा वापर करता येईल.