झाडशहापूर परिसरात नागरिक-पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग करत आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीतील दोन सशस्त्र गुन्हेगारांना बेडय़ा ठोकण्यात आल्या. रविवारी भरदुपारी झाडशहापूर परिसरात ही फिल्मी स्टाईल कारवाई करण्यात आली असून चोरी करून पलायन करताना त्यांना पकडण्यात आले आहे. या टोळीने बेळगाव परिसरात मोठय़ा प्रमाणात चोऱया, घरफोडय़ा केल्याचे उघडकीस आले आहे.
प्रकाश पाटील (वय 31) मूळचा राहणार शहापूर व सध्या राहणार गोवा, निताई मंडल (वय 41) राहणार पश्चिम बंगाल अशी अटक करण्यात आलेल्या जोडगोळीची नावे आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील चन्नाप्पा हुंचाळ व योगेश तळेवाड या दोन पोलिसांनी मोठय़ा धाडसाने झडप घालून या सशस्त्र टोळीतील गुन्हेगारांना नागरिकांच्या मदतीने पकडले आहे.
रात्री उशिरापर्यंत बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात त्यांची चौकशी करण्यात येत होती. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी तपास हाती घेतला असून मोठय़ा प्रमाणात चोरी प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्मयता आहे. या गुन्हेगारांजवळून चाकू, जांबिया, तलवारी आदी शस्त्रs पोलिसांनी जप्त केली आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रविवारी दुपारी एकच्या सुमारास झाडशहापूर ग्राम पंचायतीचे माजी चेअरमन मल्लाप्पा गोरल व त्यांच्या भावाच्या घरी चोरीचा प्रकार घडला. चोरी करून पळून जाणाऱया जोडगोळीला त्याच गावातील एका महिलेने पाहिले आणि त्यांना पकडण्यासाठी एकच आरडाओरडा सुरू केला.
पोलिसांनी सुरू केला पाठलाग
त्याचवेळी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील चन्नाप्पा हुंचाळ व योगेश तळेवाड हे पोलीस अन्य कामानिमित्त मोटारसायकलवरून या मार्गावरून जात होते. आरडाओरडा ऐकून पोलिसांनी त्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी दोन्ही हातात जांबिया व चाकू घेऊन गुन्हेगार पळताना त्यांना दिसले. पोलिसांनी आपली मोटारसायकल उभी करून त्यांचा पाठलाग सुरू केला.
चाकूने भोसकण्याची धमकी
पोलिसांनी पाठलाग सुरू करताच दोन्ही गुन्हेगार शेतवडीत पळाले. गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत पोलिसांना चकवा देत पळत राहिले. अधूनमधून पोलिसांना चाकूचा धाक दाखवत भोसकण्याची धमकी देत होते. हा प्रकार पाहून शेतात काम करणारे शेतकरीही पोलिसांच्या मदतीला धावले. त्यावेळी गुन्हेगारांनी नागरिकांनाही भोसकण्याची धमकी दिली. अखेर मोठय़ा धाडसाने व शिताफीने झडप घालून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
नागरिकांच्या मदतीने दोन्ही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात आणले. वरि÷ अधिकाऱयांना यासंबंधीची माहिती देण्यात आली व रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात येत होती. प्रकाश पाटील हा मूळचा बेळगावचा असून महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यात त्याने मोठय़ा प्रमाणात गुन्हे केले आहेत. यापूर्वीही बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती.
पोलिसांनी पाठलाग करून दोघा जणांना ताब्यात घेतले असले तरी प्रत्यक्षात या गुन्हेगारांची संख्या किती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण पेटा कारमधून हे गुन्हेगार झाडशहापूरला आले आहेत. गावापासून एक किलोमीटरवर कार उभी करून चोरीसाठी गावात प्रवेश केला होता. या टोळीत आणखी दोघे जण असावेत, असा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
घातक शस्त्र…बनावट नंबरप्लेट
या टोळीतील गुन्हेगारांजवळ आढळलेल्या बॅगमध्ये चाकू, जांबिया, आदी घातक शस्त्र आढळून आली असून घरफोडीसाठी लागणारी अवजारेही बॅगमध्ये होती. तर कारमधून पोलिसांनी तलवार व पिस्तूल, जीवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. कारवर जीए 06, ई 2869 असा क्रमांक लिहिलेला होता. कारमध्ये बनावट नंबरप्लेटच्या स्टीकरचा गठ्ठाच सापडला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस या जोडगोळीची चौकशी करीत होते. चौकशीअंतीच अधिक माहिती उपलब्ध होणार आहे.