मृत दोघेही गदग जिल्हय़ाचे रहिवासी : एक जण गंभीर जखमी : कित्तूरजवळच्या इटगी वळणावरील दुर्घटना
वार्ताहर / बाळेपुंद्री
ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारी थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रकचालकासह दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुकवारी एम. के. हुबळी राष्ट्रीय महामार्गावरील इटगी गावच्या वळणाजवळ घडली.
गदग जिल्हय़ातील गजेंद्रगड गावचा कुडलेप्पा नेल्लूर (वय 42) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे, तर गदग जिल्हय़ातील वीरापूर गावचा रहिवासी यल्लाप्पा सनयल्लाप्पा घोरपडे (वय 52) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या अपघातात राकेश (वय 37) असे गंभीर जखमी झालेल्या अन्य एका ट्रकचालकाचे नाव आहे.
उपचारासाठी त्याला तातडीने बेळगाव इ†िस्पतळात दाखल करण्यात आले आहे. याविषयी कित्तूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुप्रवारी दुपारच्या सुमारास ट्रक बेळगावहून धारवाडकडे जात असताना इटगी गावच्या क्रॉसजवळ नादुरुस्त अवस्थेत रस्त्याशेजारी एक ट्रक थांबला होता. त्या ट्रकच्या पाठीमागे ट्रकचालक कुडलेप्पा व यल्लाप्पा हे दोघेही ट्रकचे दुरुस्तीचे काम करत होते. याचवेळी बेळगावहून धारवाडकडे जाणाऱया ट्रकने थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने ट्रकचालक कुडलेप्पा व यल्लाप्पा यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात चालक राकेश हा गंभीर जखमी झाला असून त्याला बेळगावच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
काचांचा खच, बघ्यांची गर्दी
पाठीमागून आलेल्या ट्रकची धडक इतकी भीषण होती की थांबलेल्या ट्रकला धडक देताच ट्रकचा समोरचा भागाचा चक्काचूर होऊन चालकाच्या बाजूचा पत्राही चक्काचूर झाला होता. तसेच रस्त्यावर काचेचा खच पडला होता. हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होते. घटनेची माहिती मिळताच कित्तूरचे सीपीआय मंजुनाथ कुसगल, पीएसआय देवराज उळागडी यांनी भेट देऊन पाहणी केली. कित्तूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.