40 जणांहून अधिक जण जखमी
बँकॉक
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये रविवारी झालेल्या भीषण दुर्घटनेत 12 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. पूर्व बँकॉकमध्ये एक बस आणि रेल्वे यांच्यात भीषण टक्कर झाल्याने 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बसमधील प्रवाशांचा समावेश आहे. हे प्रवासी एका धार्मिक कार्यक्रमात सामील होण्यासाठी जात होते असे सांगण्यात येते. या दुर्घटनेत बसचा वरील भाग तुटून पडला आहे. क्रेनच्या मदतीने बस उचलण्यात आल्याची माहिती बचाव कर्मचाऱयांनी दिली आहे. थायलंडमध्ये अशाप्रकारच्या घातक दुर्घटनांचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. धोकादायक रस्त्यांसह भरधाव वेग, नशेत वाहन चालविणे आणि कमकुवत कायदा अंमलबजावणी ही यामागील कारणे आहेत.