अभिनेत्री हिना खान ही छोटय़ा पडद्यासोबतच बॉलिवूडमध्येही स्वतःची ओळख निर्माण करण्यास यशस्वी ठरली आहे. तिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून छोटय़ा पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेतील अक्षरा या तिच्या व्यक्तिरेखेने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जवळपास आठ वर्षे ही भूमिका साकारल्यावर तिने ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या रिऍलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ‘बिग बॉस 13’मध्ये ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. हिना आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती आहे.
हिना दक्षिणेचा सुपरस्टार प्रभाससोबत ‘वृंदावन’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हिना आणि प्रभासला एकत्र काम करताना पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच असणार आहे.
हिना खान सोशल मीडियावर सक्रीय असते आणि ती व्हिडिओ आणि छायाचित्रांच्या माध्यमातून स्वतःचे मत मांडताना दिसून येते. काही दिवसांपूर्वी हिनाचा साडीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.