ज्युनियर एनटीआरसोबत दिसून येणार
अभिनेत्री जान्हवी कपूर अणि दक्षिणेतील सुपरस्टार ज्युनियर एनटीआर हे दिग्दर्शक बुची बाबू यांच्या पुढील चित्रपटात एकत्र दिसून येणार असल्याचे वृत्त आहे. परंतु यासंबंधी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ला प्रदर्शनापूर्वी मिळत असलेला प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी आणखी एक पॅन इंडिया चित्रपट निर्माण करण्याची तयारी चालविली आहे. अशा स्थितीत निर्माते बॉलिवूड अभिनेत्रीला चित्रपटात सामील करण्याची योजना आखत असून यात जान्हवी कपूरचे नाव समोर येत आहे.
ज्युनियर एनटीआरच्या आगामी चित्रपटात जान्हवीला नायिकेची भूमिका मिळणार असल्याची चर्चा आहे. अभिनेत्रीने या चित्रपटासाठी होकार दिला की नाही यासंबंधी कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.
विजय देवरकोंडासोबत चित्रपट
लायगरचे दिग्दर्शक पुरी जगन्नाथ पुन्हा एकदा विजय देवरकोंडासोबत काम करणार असून स्वतःच्या आगामी चित्रपटात जान्हवी कपूरला अभिनेत्री म्हणून सामील करणार असल्याची चर्चा आहे. जान्हवी कपूर लवकरच क्रिकेट ड्रामामध्ये दिसणार आहे. चित्रपट निर्माता करण जौहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने मागील वर्षी ‘मिस्टर अँड मिसेज माही’ची घोषणा केली होती.