वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
दक्षिण आफ्रिकेचा 35 वर्षीय पुरूष टेनिसपटू केविन अँडरसनने रविवारी येथे हॉल ऑफ फेम टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद पटकाविले. एटीपी टूरवरील अँडरसनचे हे सातवे विजेतेपद आहे.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात अँडरसनने अमेरिकेच्या 20 वर्षीय ब्रुक्सबायचा 7-6 (10-8), 6-4 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेत अँडरसनला वाईल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत अँडरसनला दुसऱया फेरीत सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोविचकडून पराभव पत्करावा लागला होता.