ऑनलाईन टीम / स्कॉटलंड :
जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून एक धक्कादायक बातमी येत आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू सोलो नक्वेनी याला कारोनाची लागण झाली आहे. याबाबत त्याने स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे.
सोलो आपल्या ट्विट मध्ये म्हणाला की, गेले काही महिने मी विविध आजारांशी लढत आहे. गेल्या वर्षी मला जिबिसी चा आजार झाला. मागील दहा महिने या आजारावर मी उपचार घेत आहे. त्यातून माझी प्रकृती सुधारत असताना मला टीबीने ग्रासले. त्यात माझे यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाले. त्यानंतर आता मला कोरोनाची बाधा झाली आहे.
पुढे तो म्हणतो, मला कळत नाही सगळे आजार मलाच का होत आहेत. अशी भावनिक पोस्ट केली आहे.
दरम्यान, सोलो हा केवळ 25 वर्षांचा असून तो सध्या स्कॉटलंडमध्ये आहे. सोलो 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 संघात क्रिकेट खेळला आहे. त्याच्या या आजारपणात आफ्रिका संघाने त्याला 50 हजार रैंडची मदत केली आहे.