प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ येथील डेंग्यू चा पहिला बळी तर कोल्हापूर जिल्ह्यात दुसरा बळी येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंजुम रहिम मेस्त्री वय वर्ष 35 यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. मेस्त्री यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
शिरोळ शहरात गेल्या महिन्यांपासून डेंग्यू या आजाराची साथ पसरली आहे.
अंजूम मेस्त्री हे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक संचालक कै. इसुफसाहेब मेस्त्री यांचे ते नातू होते. गतवर्षी झालेल्या दत्त कारखान्यांच्या सचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटातून गणपतराव पाटील यांनी त्यांना उमेदवारी दिली होती. मेस्त्री हे गेल्याच महिन्यांत रमजानचा रोजा पूर्ण केला होता 28 मे रोजी त्यांना डेंग्यू ची लागण झाली दत्त कारखान्यांच्या कार्यस्थळावरील आरोग्य केंद्रामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले होते.
डेंग्यूच्या आजरामधूनच त्यांना कावीळ किडणी व लिव्हर खराब झाली प्रकृती अत्यंत खराब झाल्याने त्यांना कोल्हापूर येथील अस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता करण्यात आले होते अतिदक्षता विभागात सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात ते तरुण संचालक म्हणून काम पाहत होते. ठाण्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील नगराध्यक्ष अमरसिंह पाटील जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने अनिल यादव यांच्यासह सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी पाच महिन्यांचा मुल भाऊ व असा मोठा परिवार असून रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी होणार आहे