अभिनेत्री निमरत कौरने स्वतःचा आगामी चित्रपट ‘दसवी’चे चित्रिकरण पूर्ण केले आहे. 10 महिन्यांपूर्वी सुरू झालेला प्रवास अखेरीस स्वतःच्या सुंदर टप्प्याला पोहोचल्याचे तिने म्हटले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहे. पिंक आणि बाटला हाउस यासारख्या चित्रपटांचे पटकथालेखक राहिलेल्या रितेश शाह यांनीच याची पटकथा तयार केली आहे.
अभिनेत्रीने चित्रपटाच्या कथानकासंबंधी फारशी माहिती देणे टाळले आहे. ‘दसवी’मध्ये विमला देवी चौधरी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ही व्यक्तिरेखा मी माझी सर्वोत्तम असल्याचे मानते. ही व्यक्तिरेखा सर्वाधिक आनंद देणारी, सर्वात रोमांचक आणि मजेशीर असल्याचे निमरन सांगते. अभिनेत्रीने मार्च महिन्यात चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले होते. ‘द लंचबॉक्स’ आणि ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटांमध्ये उत्तम अभिनयासाठी निमरतला ओळखले जाते. दसवी चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन आणि यामी गौतम देखील काम करत आहे. हा चित्रपटाची निर्मिती जियो स्टुडिओज आणि मॅडॉक फिल्म्सकडून संयुक्तपणे केली जात आहे.