अमेरिकेचा पुन्हा पाकिस्तानला मोठा दणका
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
दहशतवाद्यांच्या यादीचा आढावा घेतल्यानंतर अमेरिकेसह आयएसआयएल-एसपी आणि इतर संघटनांनी लष्कर-ए-तोयबा आणि लष्कर-एöझांगवी (एलजे) या संघटनांना कायम ठेवले आहे. सत्ता हस्तांतरित होण्याच्या काही दिवस अगोदर अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने नवी यादी जाहीर केली आहे. या यादीत दहशतवाद्यांच्या यादीमध्ये लष्कर-ए-तोयबाचे स्थान अबाधित राहिल्याने पाकिस्तानला मोठा दणका मिळाला आहे.
अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या यादीचा नुकताच आढावा घेतला आहे. त्यानंतर एलजे, आयएसआयएल-एसपी, लष्कर-ए-तोयबा, जैश रिजाल अल-तारिक अल नक्षबंदी, जमातुल अन्सारुल मुसलिमेनिया फे बिलादिस-सुदान (अंसारू), अल-नुसरत प्रंट, कंटिन्युटी आयरिश रिपब्लिकन आर्मी आणि नॅशनल लिबरेशन आर्मी यांना या यादीमध्ये कायम ठेवले आहे. फेडरल रजिस्ट्रेशनच्या अधिसूचनेमध्ये परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी प्रशासकीय कागदपत्रांच्या आढावाच्या आधारे ही यादी जाहीर केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.