ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाच्या रक्षणासाठी लढणाऱया वीर जवानांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात विविध मोहिमांमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करणाऱया लष्कारातील सहा जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे.
यामध्ये लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा, मेजर कोंजेंगबम बिजेंद्र सिंह, नायब सुभेदार नरेंद्र सिंह, नायब सुभेदार सोमबीर, नाईक नरेश कुमार, शिपाई करमदेव ऑरिअन यांचा शौर्य चक्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
दरम्यान, लेफ्टनंट कर्नल ज्योती लामा यांनी मणिपूरमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी एक माहिती नेटवर्क तयार केलं. याच बळावर त्यांच्या नेतृत्वाखाली तुकडीनं 14 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.