गत पाच वर्षांतील सर्वाधिक निकाल सरकारी विद्यालयांच्या कामगिरीत चांगली सुधारणा राज्याती 118 शाळांचा 100 टक्के निकाल
प्रतिनिधी / पणजी
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने मे-जूनमध्ये घेतलेल्या दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल जाहीर केला असून 92.69 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत हा निकाल सर्वाधिक असून 83 अनुदानित (खासगी) शाळा तर 35 सरकारी शाळा मिळून 118 शाळांनी 100 टक्के निकाल दिला आहे.
मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत आणि सचिव भगिरथ शेटये यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत निकालाचा सविस्तर तपशील सादर केला.
पाच वर्षांतील सर्वाधिक निकाल
एकूण 18939 मुलांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील 17554 जण उत्तीर्ण होऊन यशस्वी झाले. हा निकाल 92.69 टक्के एवढा असून 9319 मुलांपैकी 8581 मुले पास झाली, तर 9620 मुलींपैकी 8973 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ती टक्केवारी अनुक्रमे 92.08 तर 93.27 अशी आहे. 2015 – 85.15 टक्के, 2016 – 90.03 टक्के, 2017 91.57 टक्के, 2018 – 91.27 टक्के, 2019 – 92.47 टक्के असा निकाल लागला होता, अशी माहिती देण्यात आली.
तब्बल 118 शाळांचा 100 टक्के निकाल
राज्यातील 118 शाळांनी 100 टक्के निकाल दिला असून त्यांची तालुकानिहाय आकडेवाडी, संख्या पुढील प्रमाणे आहे. बार्देश तालुका – 8 अनुदानित शाळा व 1 सकारी शाळा एकूण 9 शाळा, डिचोली तालुका – 4 अधिक 7 एकूण 11, काणकोण तालुका 1 अधिक 3 एकूण 4, धारबांदोडा तालुका – 4 अधिक 1 एकूण 5, केपे 0 अधिक 4 एकूण 4, मुरगाव 11 अधिक 0 एकूण 11, पेडणे तालुका 11 अधिक 5 एकूण 16, फोंडा तालुका – 14 अधिक 2 एकूण 16, सालसेत तालुका – 17 अधिक 0 एकूण 17, सत्तरी तालुका 1 अधिक 6 एकूण 7 शाळा, सांगे तालुका – 0 अधिक 4 एकूण 4 शाळा, तिसवाडी तालुका – 12 अधिक 2 एकूण 14 शाळा.
महाराष्ट्र, कर्नाटकातही होती परीक्षा केंद्रे
दहावीची परीक्षा 21 मे ते 6 जून या कालावधीत कोरोनाचे सावट असतानाही सर्व शिष्टाचार पाळून मंडळातर्फे घेण्यात आली होती. एकूण 29 केंद्रे आणि 173 उपकेंद्रातून सदर परीक्षा झाली. त्यातील 4 उपकेंद्रे महाराष्ट्रात तर 2 उपकेंद्रे कर्नाटकात गोव्याच्या सीमेजवळील जिह्यात होती, अशी माहिती देण्यात आली.
सुमारे 7073 परीक्षार्थिंना क्रीडा गुणांचा लाभ झाला. त्यामुळे 273 जणांचा फायदा होऊन ते पास ठरले.
पुरवणी परीक्षा 3 सप्टेंबर रोजी
ही परीक्षा चुकलेल्यांसाठी, नापास झालेल्यांसाठी तसेच टक्केवारी वाढवण्यासाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार असून तिची तारीख 3 सष्टेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे. ती तारीख अंदाजे असून कोरोनाची परिस्थिती, सरकारची मान्यता यावरच त्या परीक्षेचे भवितव्य अवलंबून आहे, असे सांगण्यात आले.
फेरतपासणी, पूनर्मुल्याकनासाठी मुदत
उत्तर पत्रिकांची फोटो कॉपी मिळविण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै असून फेरतपासणी व पूनर्मुल्यांकन याकरिता 8 ऑगस्ट अशी मुदत मंडळाने दिली आहे. त्या मुदतीत ऑनलाईन अर्ज करावेत. त्याकरीता मंडळाने पोर्टल खुले करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
अंतर्गत गुण, क्रीडा गुण, प्रतीक्षा (ग्रेस) गुण आणि मुलांची प्रगती यामुळे प्रतिवर्षी निकालाची टक्केवारी वाढत असल्याचे समोर आले आहे. कोकणी-मराठी-संस्कृत या भाषा विषयात मुलांनी 100 पैकी 98 पर्यंत गुण घेतले आहेत. पुरवणी परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्यास एक परीक्षा केंद्र देण्यात येणार असून कोरोनाचे सावट असल्यामुळे परीक्षार्थिंना लांब प्रवास करावा लागू नये, तालुक्यात जवळच केंद्र मिळावे या हेतूने ही तयारी करण्यात आल्याचे त्यांनी पुढे सांगितले. मंडळाचे इतर पदाधिकारी भारत चोपडे, ज्योत्स्ना सरीन यावेळी उपस्थित होते.
वादग्रस्त प्रश्न विचारणारे चारही शिक्षक दोषी
प्रतिनिधी / पणजी
दहावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये वादग्रस्त प्रश्न समाविष्ठ केल्याचा ठपका ठेऊन चार शिक्षकांना गोवा माध्यमिकöउच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दोषी ठरवले असून त्यांना मंडळाच्या कोणत्याही कामात यापुढे मनाई करण्यात आली आहे.
अलिकडे झालेल्या दहावी परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पोर्तुगीज पासपोर्ट व इतर काही प्रश्न आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. अनेकांनी त्याचा संबंध सरकारशी जोडून भाजप तसेच सरकारवर टीकाही केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मंडळाने या प्रकरणी चौकशी समिती नेमली होती आणि त्या समितीने संबंधित चार शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा बजावून त्यांना स्पष्टीकरण देण्याची सूचना केली होती. त्यानुसार त्यांचे उत्तर आल्यानंतर समितीने चौकशी करून प्रश्नपत्रिका निश्चित करणाऱया चार शिक्षकांना दोषी ठरवून तो अहवाल मंडळाला सादर केला. त्यानुसार मंडळाने संबंधित चारही शिक्षकांना दोषी ठरवले असून त्यांना यापुढे प्रश्नपत्रिका निश्चित करण्यापासून मंडळाचे कोणतेही काम सोपवण्यास मनाई केल्याचे व निर्बंध घातल्याचे सांगण्यात आले.
शंभर टक्के निकाल देणारी विद्यालये
1) सेंट जोझफ हायस्कूल – हडफडे
2) होली क्रॉस हायस्कूल – बस्तोडा
3) सरकारी हायस्कूल – नादोडा
4) माय दे देऊस हायस्कूल – खोर्जुवे
5) विद्यानिकेतन हायस्कूल – कळंगुट
6) सेमिनारी ऑफ अवर लेडी हायस्कूल – साळगांव
7) चबी चिक्स प्रिंग व्हॅली हायस्कूल – पर्वरी
8) ज्ञानविकास स्कूल – पर्वरी
9) डिव्हाईन मर्सी एडगर ब्रागांझा हायस्कूल – म्हापसा
10) अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कूल – डिचोली
11) विजयानंद हायस्कूल – मये
12) सरकारी हायस्कूल – आमोणे डिचोली
13) पैरा हायस्कूल – पैरा
14) महालक्ष्मी हायस्कूल – कुडणे
15) सरकारी हायस्कूल – मेणकुरे
16) सरकारी हायस्कूल – शिरगांव
17) सरकारी हायस्कूल – नावेली डिचोली
18) सरकारी हायस्कूल – कासारपाल
19) सरकारी हायस्कूल – तारमाथा सुर्ला डिचोली
20) सरकारी हायस्कूल – मुळगांव
21) श्री मल्लिकार्जून विद्यालय – काणकोण
22) सरकारी हायस्कूल – गवळखोल काणकोण
23) सरकारी हायस्कूल – खोतीगांव
24) सरकारी हायस्कूल – श्रीस्थळ
25) सेंट जोझफ इन्स्टिटय़ूट – वास्को
26) सेंट अँड्य्रु इन्स्टिटय़ूट – वास्को
27) सेंट तेरेझा हायस्कूल – वास्को
28) सेंट जोझफ वाझ हायस्कूल – सांकवाळ
29) अवर लेडी ऑफ पर्पेच्युअल हायस्कूल – कुठ्ठाळी
30) अवर लेडी ऑफ कांदेलारिया हायस्कूल – बायणा
31) श्रीसुशेनाश्रम हायस्कूल – हार्बर वास्को
32) केशव स्मृती हायस्कूल – दाबोळी
33) ऍरवे पब्लिक स्कूल – सांकवाळ
34) विद्याविहार हायस्कूल – कुठ्ठाळी
35) सेंट ऍनी हायस्कूल – केळशी कुठ्ठाळी
36) विस्काऊंट ऑफ पेडणे हायस्कूल – पेडणे
37) सरकारी हायस्कूल – अगरवाडा
38) न्यू इंग्लिश हायस्कूल – केरी पेडणे
39) श्रीकमलेश्वर हायस्कूल – कोरगांव
40) हुतात्मा बापू गावस सरकारी हायस्कूल – चांदेल
41) मांगिरीश विद्यालय इंग्लिश हायस्कूल – आरोबा
42) प्रज्ञा हायस्कूल – देवसू कोरगांव
43) रमाकांत खलप हायस्कूल – मांद्रे
44) सरकारी हायस्कूल – वझरी पेडणे
45) श्रीकमलेश्वर हायस्कूल – पेठेचा वाडा कोरगांव
46) पिटर आल्वारिस मेमोरियल हायस्कूल – मोरजी
47) पार्से हायस्कूल – पार्से
48) गव्हर्नमेंट हायस्कूल – धारगळ
49) सरकारी हायस्कूल – हणखणे
50) सेंट झेवियर विद्यालय – मायणा कोरगांव
51) श्रीज्ञानदीप अकादमी हायस्कूल – कासारवर्णे
52) श्रीनवदुर्गा विद्यालय – मडकई
53) शिक्षासदन – प्रियोळ
54) श्रीमती कमलाबाई हेदे हायस्कूल – शिरोडा
55) सेंट मेरीस हायस्कूल – फोंडा
56) सुरश्री केसरबाई केरकर हायस्कूल – केरी
57) महात्मा गांधी सेंटनरी स्कूल – गावणे
58) श्रीनवदुर्गा हायस्कूल – पाळी
59) स्वस्तिक विद्यालय – प्रियोळ
60) डॉ. सखाराम गुडे हायस्कूल – शिरोडा
61) सरकारी हायस्कूल – कुंडई
62) श्री ब्रह्मदुर्गा हायस्कूल – शिरोडा
63) सरकारी हायस्कूल – गांजे
64) आनंदीबाई एम. नाईक हायस्कूल – मडकई
65) लोकविश्वास प्रतिष्ठान हायस्कूल – ढवळी
66) विद्यावृद्धी स्कूल – फोंडा
67) डॉ. के. बी. हेडगेवार विद्यालय – फोंडा
68) सरकारी हायस्कूल – मायणा केपे
69) सरकारी हायस्कूल – पाडी केपे
70) सरकारी हायस्कूल – मोरपिर्ला
71) सरकारी हायस्कूल – आंबावली केपे
72) भाटीकर मॉडेल हायस्कूल – मडगांव
73) पॉप्युलर हायस्कूल – मडगांव
74) प्रेझेंटेशन कॉन्वेंट हायस्कूल – मडगांव
75) सेंट पियुश हायस्कूल – ओर्ली मडगांव
76) सेंट झेवियर हायस्कूल – वेळ्ळी
77) रेजिना मार्टिरम हायस्कूल – असोळणा
78) सेंट मेरी ऑफ आग्नेल कॉन्वेंट – चिंचिणी
79) होली क्रॉस इस्टिटय़ूट – केळशी
80) सेंट अँथोनी हायस्कूल – कुंकळ्ळी
81) अवर लेडी ऑफ लुर्डस हायस्कूल – उतोर्डा
82) पॉश इंग्लिश हायस्कूल – नावेली सासष्टी
83) शिशू विकास हायस्कूल – आकें बायश
84) अल फलाह एज्युकेशन क्रेसंट स्कूल – फातोर्डा
85) अल हुदा इंटरनॅशनल इस्लामिक स्कूल – मडगांव
86) सेंट अँथोनी हायस्कूल – मडगाव
87) रवींद्र केळेकर ज्ञानमंदिर – विद्यानगर आके
88) इक्रा इंग्लिश स्कूल – शिरवडें मडगांव
89) सरकारी हायस्कूल – नेतुर्ली
90) सरकारी हायस्कूल – वाडे कुर्डी
91) सरकारी हायस्कूल – कालें
92) सरकारी हायस्कूल – वालकिणी भाटी
93) सरकारी हायस्कूल – अडवई सत्तरी
94) सरकारी हायस्कूल – आंबेडे
95) सरकारी हायस्कूल – शेळप खूर्द
96) सरकारी हायस्कूल – पिसुर्ले
97) सरकारी हायस्कूल – सावर्डे सत्तरी
98) सरकारी हायस्कूल – सुर्ला सत्तरी
99) विवेकानंद ज्ञानमंदिर हायस्कूल – घोटेली
100) पिपल्स हायस्कूल – पणजी
101) अवर लेडी ऑफ रोझरी हायस्कूल – दोनापावला
102) फा. आग्नेल हायस्कूल – पिलार
103) श्री शारदा विद्यालय सरकारी हायस्कूल – कुंभारजुवे
104) दयानंद हायस्कूल – चोडण
105) श्रीदयानंद आर्या हायस्कूल – नेवरा
106) सेंट लॉरेन्स हायस्कूल – आगशी
107) सेंट ऍलॉयसीस हायस्कूल – दिवाडी
108) जिझस अँड मॅरी सार्वजनिक हायस्कूल – करमळी
109) डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूल – कुजिरा
110) सेंट झेवियर अकादमी – ओल्ड गोवा
111) सरकारी हायस्कूल – शिरदोन
112) रॉयल सेकंडरी स्कूल – ताळगांव
113) फेअरलँड हायस्कूल – भाटी गोवा वेल्हा
114) अवर लेडी ऑफ पायटी हायस्कूल – कुळे
115) गोमंतक विद्यालय – पिळये धारबांदोडा
116) सोमनाथ हायस्कूल – सावरगाळ किर्लपाल
117) सरकारी हायस्कूल – दयानंदनगर धारबांदोडा
118) साकोर्डा एज्युकेशन सोसायटी स्कूल – साकोर्डा