-www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या दि. 20 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन विद्यार्थ्यांना पाहावयास येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा सप्टेबर महिन्यात सुरू होवून 12 ऑक्टोबर रोजी संपली. या परीक्षेला कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयातून 2 हजार विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द होणार आहे. या निकालाची हार्डकॉपी विद्यार्थ्यांना काढून घेता येणार आहे. गुणपडताळणीची शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी 21 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना छायाप्रतीसाठी 21 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल पाहावा, असे आवाहन सचिव कुलाळ यांनी केले आहे.