दातांवर एक कठीण आवरण असते. हे आवरण खनिज पदार्थांचे बनलेले असते. यास फ्लोराईड असे म्हणतात.
फ्लोराईडमुळे दातांची किडण्याची क्रिया मंदावते.
फ्लोराईडचा हा परिणाम इनॅमल खराब होण्यास रोखतो आणि खनिज पदार्थांच्या कमतरतेची पूर्तता करण्यास स्वाभाविक मदत करतो.
फ्लोराईड मिश्रित पिण्याचे पाणी आणि मंजन हे फ्लोराइडचे चांगले स्त्रोत आहेत.
आपल्या पिण्याच्या पाण्यात फ्लोराइड नसल्यास याची सप्लीमेंट घेता येऊ शकते.
दातांच्या कमजोर भागावर लक्ष न दिल्यास तेथे छिद्र बनून भोजनाचे कण आणि मळ एकत्रित होतात आणि दात सडू लागतात. अन्य दातांतही ही समस्या पसरू शकते.
दात किडण्याची सुरवात सर्वांत प्रथम चावण्यासाठी उपयोगात येणार्या दाताच्या आवरणापासून होते. वेळीच याचा उपचार न केल्यास दात पोकळ होतो, तर फ्लोराइड दात किडण्यास रोखते.
म्हणूनच दातांच्या सुरक्षिततेसाठी फ्लोराइडयुक्त मंजनाचा उपयोग करावा.
– डॉ. निखिल देशमुख