ऑनलाईन टीम / मुंबई :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या लोकांच्या संदर्भात मुंबई सक्तवसुली संचलनालयाने मुंबईत दहा ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. संदर्भातील प्रकरणांमध्ये महाराष्ट्रातील एक मंत्रीही सहभागी असल्याची ईडीला शंका असून, त्या मंत्र्याचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
दाऊद इब्राहिम परदेशात बसून देशामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करतो असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. दाऊचा पंजाबपर्यंत संबंध असल्याची माहिती समोर आली असून, आयएसआयकडून अंडरवर्ल्डचा वापर पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दाऊदशी संबंधित असलेल्या लोकांच्या मालमत्तांवर आज सकाळी छापे टाकले.
ईडीने आज पहाटेपासून 10 ठिकाणी छापे टाकले. पण, नेमक्या कोणाच्या आणि कोणत्या मालमत्तांवर छापे मारले याची माहिती मिळू शकलेली नाही. परंतु, कारवाईच्या फेऱ्यात आलेल्या व्यक्तीचे दाऊद इब्राहिम आणि दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्या आठवडय़ात संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता ईडी आणि एनआयएकडून हे छापे टाकले जात आहेत. त्यामुळे या कारवाईकडे लक्ष लागले आहे.