दापोली / प्रतिनिधी
दापोली नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना युतीच्या उमेदवारांनी वर्चस्व मिळवले. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांनी 17 पैकी 14 जागांवर विजय मिळवला. तर या निवडणुकीत काँग्रेस व मनसेला भोपळाही फोडता आला नाही. भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले. नाराज शिवसेना गटाचे शिट्टी निशाणी घेऊन उभे असणारे केवळ दोन उमेदवार या निवडणुकीत निवडून आले आहेत. निवडणुकी पश्चात राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.