प्रतिनिधी / मिरज
पतीसह माहेरगांवी राहण्यास आलेल्या मुलीशी भांडण करुन दारुड्या बापानेच विनयभंग केला. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना सुभाषनगर येथे घडली. सदर विवाहित मुलीने मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून, वडील सतिश जगनाथ आंबवडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, सुभाषनगर येथे क्षिरसागर मळ्यात तिचे माहेर असून, गेल्या काही दिवसांपासून ती आणि तिचा पती हे दोघेजण राहण्यास आले आहेत. ती दुपारच्यावेळी घरात एकटीच भांडी घासत असताना तिचा दारुडा बाप सतिश आंबवडे हा तेथे आला. त्याने सदर तरुणीला तू आमच्या घरात राहू नकोस, तुझ्या नवऱ्याला घेऊन जा असे म्हणून तिच्याशी वाद घातला. या दरम्यान, त्याने सदर तरुणी समोरच लघुशंका केली व तिला लज्जा उत्पन्न होईल, असे अश्लिल हावभाव करुन विनयभंग केला असल्याची तक्रार मुलीने दिली आहे. पोलिसांनी दारुड्या बापावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.