ऑनलाईन टीम/तरुण भारत
नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमी चर्चेत असणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अजब वक्तव्य केलं आहे. दरम्यन, मध्य प्रदेशातील भाजप सरकारने दारू स्वस्त झाल्याची घोषणा नुकतीच केलीय. त्यानंतर भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे अजब विधान समोर आले आहे. त्यांनी दारू पिणे हे लाभदायक आहे. दारू कमी पिणे हे आयुर्वेदात औषधासारखे आहे, असं अजब विधान त्यांनी गुरुवारी केलं.
दरम्यान, मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान सरकारने राज्यात नवीन उत्पादन शुल्क धोरण आणले आहे, जे 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे. सरकारने हे धोरण लागू केल्यास राज्यातील दारूच्या किमती कमी होणार आहेत. या प्रकरणी पत्रकारांनी खासदार साध्वी प्रज्ञा यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अजब विधान केले. मध्य प्रदेशात दारूबंदी करावी, अशी मागणी सर्वात आधी त्यांनीच केली होती. आता मध्य प्रदेशातील भाजप सरकारने दारू स्वस्त करण्याचा निर्णय घेतला असता दारू मर्यादेत पिणे हे औषधासारखं आहे, असं विधान प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं.
नवीन धोरण लागू झाल्यास दारूचे दर कमी होणार आहेत याविषयी खासदार साध्वी प्रज्ञा यांना विचारले असता त्यांनी, मर्यादित प्रमाणात मद्यपान करणे औषधासारखे आहे. तर अमर्यादीत दारू पिणे हे विषासारखे आहे. प्रत्येकानं हे समजून घ्याला हवं . अल्कोहोलच्या अतिवसेवनाचे हानिकारक परिणाम समजून घ्यावे. स्वस्त असेल किंवा महाग दारूचे प्रमाण मर्यादीत असावे, असं प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.