पेठ वडगाव येथून करण्यात आला होता फोन
कोल्हापूर/प्रतिनिधी
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात बॉम्बचा केलेला कॉल हा दारूच्या नशेत हा फोन केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बाळासो कुरणे, सुरेश लोंढे या दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान हा फोन पेठ वडगाव येथून करण्यात आला होता. या दोघांनी गोवा कंट्रोल रूमला कॉल केला होता. गोवा कंट्रोल रूम मधून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे याना संपर्क करण्यात आला.