बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ८० हजारापेक्षा कमी आहे. राज्यात बुधवारी ३,३८२ नवीन संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तर १२,७७६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात बुधवारी ११३रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. बुधवारी राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १.९७ टक्के होते. तर मृत्यू दर ३.२८ टक्के होता.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ८१३ रुग्ण आढळले. तर याचवेळी ९,५४९ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात ११ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८,४३,८१० वर पोहोचली आहे. तर यापैकी २७,३२,२४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३५,०४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७६,५०५ इतकी आहे.