ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असतानाच, महाराष्ट्रातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. राज्यात मागील 24 तासात 32,007 रुग्णांची प्रकृती सुधारली. तर आता पर्यंत 9 लाख 16 हजार 348 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 74.84 % आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 15,738 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 12 लाख 24 हजार 380 वर पोहचली आहे. सध्या 2 लाख 74 हजार 623 रुग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी दिवसभरात 344 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 33 हजार 015 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.7 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 59 लाख 12 हजार 258 नमुन्यांपैकी 12 लाख 24 हजार 380 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 18 लाख 58 हजार 924 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 517 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.