सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयच्या अलुम्नि सेलचे विद्यार्थी घेऊन येत आहेत ‘अलुम्नि टोक्स’. ह्याचे ह्या वर्षातील पाहिले पुष्प लवकरच युट्यूब वरिल सिडनहॅम अलुम्नि सेलच्या चेनेल वर 20 सप्टेंबर ला संध्याकाळी 04.00 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध अलुम्नि श्री. दिलिप पिरामल ह्यांच्याशी ‘जीवनाची मूलभूत तत्त्वे आणि व्यवसायातील विविध अनुभव’ ह्यावर आधारित लाईव्ह / थेट संवाद साधायची संधी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच युट्यूबच्या लाईव्ह चॅट मध्ये सुद्धा प्रेक्षकांना प्रश्न विचारायची संधी मिळेल. श्री. दिलिप पिरामल , हे गेली 40 वर्षे व्हीआयपी इंडस्ट्रीज चे अध्यक्ष (चेरमन) आहेत. कार्यक्रमाचा उद्देश मुख्यतः त्यांच्या अनुभवातून बोध घेणे व त्यांच्या उपदेशाचा उत्तमरीत्या आपल्या जीवनात वापर करणे हा आहे.
ह्यात विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रेक्षक म्हणून उपस्थिती नोंदवतील. 30-35 कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल. ह्याच्या आयोजनाची जवाबदारी सिडनहॅम अलुम्नि सेलचे विद्यार्थी अध्यक्ष कु. यश बाबरेकर , कु. अंकिता खरे तसेच ह्याचे नियोजन करणारे कु. फ्रेया शेख , कु. सौरभ अनासुने , कु. विनी श्रीवास्तव ह्यांच्यावर आहे. तर , नक्कीच ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा.सहभागी विद्यार्थ्यांना इ- प्रमाणपत्र देण्यात येईल जे स्वतः दिलीपजींनी प्रमाणीत केलेले असेल. त्यासाठीची लिंक विडिओ शेवटी डिस्क्रिपशन मध्ये काही वेळ उपलब्ध करून दिली जाईल.