रोहिणी न्यायालयात दिवसाढवळय़ा गोळीबार, हादरवणाऱया घटनेत दोन शूटर्ससह चौघांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील रोहिणी कोर्ट परिसरात शुक्रवारी भरदुपारी गँगवॉर झाले. वकिलाच्या वेशात असलेल्या हल्लेखोरांनी भर न्यायालयात केलेल्या गोळीबारात गँगस्टर जितेंद्र गोगी ठार झाला. तसेच पोलिसांनीही बदमाशांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले आणि दोघांना ठार केले. या गँगवॉरमध्ये गोगी व त्याच्यावर हल्ला करणाऱया दोघांसह एकूण चार जण मारले गेले आहेत. तसेच गोळीबारात अन्य 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. गोगीवर हल्ला करणारे टिल्लू ताजपुरीया टोळीचे शूटर्स असल्याचे स्पष्ट झाले आहे. गँगस्टर गोगी आणि टिल्लू गँगमधील पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली आहे.
दिल्लीतील रोहिणी न्यायालयात शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सशस्त्र मारेकऱयांनी वकिलाच्या वेशात एन्ट्री केली. हे हल्लेखोर कुख्यात बदमाश गोगीला मारण्यासाठी आले होते. याचदरम्यान गँगस्टर गोगी याला न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. टिल्लू टोळीचे दोन हल्लेखोर वकिलांच्या वेशात आले होते. त्यांनी न्यायालयाच्या खोली क्रमांक 207 मध्ये न्यायाधीश गगनदीप सिंह यांच्यासमोर गोगीवर गोळय़ा झाडल्या. हल्लेखोर वकिलांच्या गणवेशात असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. हल्लेखोरांनी गोगीवर सलग तीन गोळय़ा झाडल्या. गोगीच्या सुरक्षेसाठी असलेल्या दिल्ली पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल हल्लेखोरांवर 25 ते 30 गोळय़ा झाडल्याने दोन्ही हल्लेखोर जागीच ठार झाले. तर गोगीला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टिल्लू गँगच्या दोघांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला आहे. वकिलांचा डेस घालून हे दोघे रोहिणी न्यायालयात आले होते. त्यांनीच जितेंद्र गोगीला गोळी मारली. हल्लेखोर दोघांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. दरम्यान, न्यायालयाच्या परिसरात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
कुख्यात गँगस्टर ठरला टोळीयुद्धाचाच बळी
वयाच्या 30 व्या वषीपासूनच जितेंद्र गोगी याचे नाव गुन्हे जगतात गाजत होते. गोगी आणि टिल्लू टोळीमध्ये अनेकवेळा टोळीयुद्ध झाले होते. या गँगवॉरमध्ये 24 पेक्षा जास्त गुन्हेगार मारले गेले आहेत. आता खुद्द गोगीही या टोळीयुद्धाचा बळी ठरला आहे. गोगी आणि टिल्लू ताजपुरीया यांच्यातील शत्रुत्व 2010 मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीपासून सुरू झाले होते. मोस्ट वॉन्टेडच्या यादीत अव्वल असलेला गँगस्टर जितेंद्र मन उर्फ गोगी (वय 30) तिहार तुरुंगातून दुबईच्या एका व्यावसायिकाकडून 50 कोटींची खंडणी मागण्याच्या आरोपावरूनही चर्चेत होता. त्याने तुरुंगातूनच सुपारी घेऊन खंडणी, अपहरण आणि हत्येचे कट रचले होते.
3 वेळा पोलिसांच्या ताब्यातून फरार
जितेंद्र गोगी 3 वेळा पोलीस कोठडीतून पळून गेला होता. अटकेपूर्वी तो दिल्ली-हरियाणा पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरला होता. दिल्ली पोलिसांनी गोगीवर चार लाख आणि हरियाणा पोलिसांनी दोन लाखांचे बक्षीस ठेवले होते. अखेरीस गेल्या वषी 3 मार्च रोजी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने गोगीला गुडगावमधील तीन साथीदारांसह पकडले. अटकेवेळी त्याच्याकडून एके-47 हस्तगत करण्यात आली होती. गोगीसोबत त्याचे कुख्यात शार्पशूटर कुलदीप मान उर्फ फज्जा, रोहित उर्फ मोई आणि कपिल उर्फ गौरव हेसुद्धा उपस्थित होते. या सर्वांवर 10 लाख 50 हजारांचे बक्षीस होते.