ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली पोलिस, बीएसएफ, सीआयएसएफ जवननंतर आता कोरोना विषाणूचा संसर्ग आता दिल्लीतील सेना भवनात ही धडकला आहे. भवनातील एका जवानाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे सेना भवन सील करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या विविध निमलष्करी दला नंतर थेट सेना भवन पर्यंत कोरोना पोहचला आहे. शुक्रवारी सेना भवनातील एक जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवालात तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लगेचच सेना भवन सील करण्यात आले आहे.
एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भवनाची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याचे काम ताबडतोब हाती घेतले जाणार आहे. तसेच या वर्गाच्या संपर्क ज्या व्यक्ती आल्या त्यांचा शोध सुरू असून या सर्वांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातील. तसेच स्वच्छता वर निर्जंतुकीकरण याचे काम पूर्ण झाल्यावर सेनाभवन सुरू करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.