ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मुसळधार पावसाने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक रस्ते बंद झाले असून, सखल भागात पाणी साठल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये आयटीओ जवळच्या अण्णानगर येथील झोपडपट्टीतील घरे वाहून गेल्याचे दिसत आहे.
मुसळधार पावसामुळे या भागातील अनेक घरे कोसळली होती. पाण्याच्या प्रवाहात ही घरे वाहून गेली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले असून, सुदैवाने या घटनेत कोणतीच जिवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. आज सकाळपासून पडणाऱ्या पावसाने अनेक भागात पाणी साचल्याने लोक त्रस्त आहेत.